जुन्या काली मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते। पण काला बरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे।
पण लोकशाही च्या कृपेने भारतीयान करता ही सुविधा निवडनुकी च्या रुपाने आजही उपलब्ध आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविनार्या लोक्शाहितिल निवडनुका ह्या सर्कस पेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर आसतात । रिंग मास्टर हा दिल्हीत बसून ह्या सर्कस ची सूत्रे हालवित असतो । याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात । गुरगुरनारे स्थानिक मंत्री, नेते शेपुट खाली घालून पक्षा वर आणि श्रेष्टिवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात । त्याच बरोबर जोकर आपल्या कोलनटया उड्या मारत नेतेगिरी करत आसतात। पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात। काशमीर पासून कन्याकुमारी गुजरात पासून नागालैंड पर्यंत ह्या सर्कस चा तंबू असतो । मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ़ ग्रामीण भाषेत तमाशा असतो। सर्कस रूपी तमाशा चा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कस ची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाही चा चोथा खांब असलेले पेपर वाले टी व्ही वाले करत आसतात।
Monday, March 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment